Thursday, June 28, 2018

युवा दिंडी!



दिंडी किंवा वारी या शब्दांबरोबर पंढरी हे नाव शेकडो वर्षांपासून जोडले गेले आहे. दिंडी हि कधीपासून सुरु झाली? कोणी सुरु केली? का सुरु केली? ईश्वर जळी, स्थळी, पाषाणी ओतप्रोत भरला आहे असे सांगणाऱ्या संतांनी दिंडी का चालू केली असावी? संत तुकाराम, ज्ञानेश्वर हि संत मंडळी दिंडीमध्ये नेमके काय करत असतील? दिंडीमधील त्यांची दिनचर्या काय असेल? दिंडी शेकडो वर्षे अविरतपणे चालू राहते यामागे कारण काय? असे अनेक प्रश्न विचार करायला लावतात.
दिंडी म्हटले कि आपल्यासमोर येते भली मोठी गर्दी! टाळ, मृदंग, वीणा आणि पताका घेऊन ताला-सुरात भजन गात पायी जाणारा भला मोठा जन-समूह! पांडुरंग हे संपूर्ण महाराष्ट्राचे अत्यंत लाडके दैवत. त्याला भेटण्यासाठी लाखो भाविक शेकडो मैलाचा प्रवास पायी करतात.
ज्या संतानी दिंडी किंवा वारी चालू केली ते सर्व युवक होते. समाजाला जागृत करण्यासाठी, सशक्त, श्रद्धावान, धैर्यवान, असे युवक घडविण्यासाठी, भक्ती हि संकल्पना समजून देण्यासाठी, एकमेकांना भेटून विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी, त्यांनी दिंडी हे माध्यम निवडले. पुढील पिढीसाठी काहीतरी सशक्त पर्याय राहावा म्हणून दिंडी हि परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यामुळेच शेकडो वर्षांपासून दिंडी आजहि यशस्वीपणे चालू आहे.
त्या काळात दळण-वळणाची साधने वेगळी होती. प्रवासाचे सर्वात सोपे साधन म्हणजे पायी चालणे! पायी चालण्यासाठी सर्वात महत्वाचे असते शारीरिक सामर्थ्य! सशक्त शरीर हे अध्यात्मासाठी अत्यंत महत्वाचे आहे हा संदेश नकळत संतानी समाज मनावर बिम्बविला. पायी चालण्यामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक पातळीवर संतुलन आपोआप साधले जाते. सर्वांना सोयीस्कर व युवकांना आकर्षित करणारी वारी समाजातील सर्व थरांमध्ये लोकप्रिय ठरली.
१५ ते २५ हे मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाचे वय आहे. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, यांसारख्या युवकांनी ऐन तारुण्यातच परमेश्वर समजून घेतला व काव्य, लिखाण केले. त्यामुळे त्यांचे विचार हे तरुणांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, संत साहित्य हे उतारवयात वाचण्यासाठी नाही हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे. गाथा, ज्ञानेश्वरी व संत साहित्य ऐन तारुण्यात समजणे महत्वाचे आहे. त्यासाठी ऑडीओ-विज्युअल माध्यमाद्वारे संतांचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम युवा दिंडी करत आहे. प्रवासा दरम्यान शाळा, महाविद्यालय यांना भेट देऊन युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांकडून युवकांना जागृत करण्याचे काम या प्रवासातून होणार आहे.
प्रवासाचे आजचे सोयीस्कर माध्यम म्हणून व साहसी प्रवासाचा अनुभव यावा म्हणून मोटार सायकल चा प्रवास निवडला आहे. प्रवासा दरम्यान राहण्याची व्यवस्था तंबू मध्ये करण्यात येणार आहे. युवा दिंडी चा प्रवास हा थोडासा खडतर असला, तरी जीवनाला नवी दिशा देणारा आहे.  

भारतीय संस्कृती आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा!

पुरेसा अभ्यास न करता स्वतःला मॉडर्न भासविण्यासाठी उठ-सूट भारतीय सण- परंपरा यावर (पातळी सोडून) टीका करायची सवय अनेकांना लागलेली आहे.
प्रत्येक गोष्ट फक्त विज्ञानाच्या आधारावरच खरी ठरली पाहिजे हा आग्रह कशाला? आणि तसे करायचे ठरले तर किती गोष्टी विज्ञानाच्या आधारावर खऱ्या ठरतील? विज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत हे लक्षात घ्या, आणि सर्वच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या ठरवायच्या असतील, विज्ञान सांगेल तेच खरे आणि बाकी सर्व खोटे असे मानायचे असेल तर त्यास 'वैज्ञानिक अंधश्रद्धा' म्हणावे लागेल. आपणाला एखादी गोष्ट नाही पटत तर नका करू, पण चुकीची माहिती देऊन दिशाभूल का करताय? चुकीच्या गोष्टींवर टीका करत असाल तर अगदी मान्य, पण योग्य गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजून घेत असाल तर ते आपले अज्ञान आहे हे समजून घ्या!
योग्य असेल तेथे टीका झालीच पाहिजे, चर्चासुद्धा झाली पाहिजे, नवीन बदल आवश्यक असेल तर करायलाही पाहिजे हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. भारतीय संस्कृतीने कायम बदल स्वीकारला आहे, नाविन्याचा शोध घेतला आहे, आणि सर्व विचारप्रवाहांना सामावून घेऊन सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे.
एखादि गोष्ट करून लोकांना बरे वाटत असेल, आनंद मिळत असेल, समाजव्यवस्था चांगली राहत असेल, पर्यावरण वाचवले जात असेल, आणि त्यामुळे कोणाचेही, कसलेही नुकसान होत नसेल तर अशा गोष्टी बिनधास्त करा, जीवनाचा आनंद घ्या! कायमच बुद्धी, विज्ञान, तर्कशास्त्र हे वापरलेच पाहिजे असे नाही. जिथे गरज आहे तिथे जरूर वापरा.

Saturday, December 10, 2016

डिजिटल गाव म्हणजे नेमके काय?


वाय फाय गावात लावणे म्हणजे डिजिटल नव्हे,
ATM चा वापर करणे म्हणजे सुद्धा डिजिटल नव्हे,
डिजिटल म्हणजे फक्त कॅशलेस व्यापार नव्हे,
तर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावकऱ्यांच्या जीवनात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक विकास घडविणे आणणे म्हणजे म्हणजे डिजिटल गाव होय.
गावातील शाळा चालविण्यासाठी सॉफ्टवेअर व मोबाईल ऍप
गावातील दुकानांसाठी सॉफ्टवेअर व मोबाइल ऍप
शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी ई कॉमर्स वेबसाईट, मोबाइल ऍप व सॉफ्टवेअर
शेतकऱ्यांना पाहिजे ते स्वस्तात खरेदी करण्यासाठी ई कॉमर्स वेबसाईट, मोबाइल ऍप व सॉफ्टवेअर
जगातील कुठलीहि बातमी समजण्यासाठी ऍप वर वर्तमानपत्र
गावातील पर्यटन वाढी साठी 'ग्राम यात्रा' हि अभूतपूर्व संकल्पना व त्यासाठी अत्याधुनिक वेबसाईट
आणि सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी 'कॅशलेस ऍप'.
हे सर्व गावकर्यांनी गावकऱ्यांसाठी निर्माण केलेले
संपूर्णपणे स्वदेशी!
डिजिटल गाव, विकसित भारत!
आपका साथ! राष्ट्र विकास!
अधिक माहितीसाठी www.digitalgao.com या वेबसाईट ला भेट द्या.
आपले गाव डिजिटल करण्यासाठी आजच संपर्क करा.  

Wednesday, December 7, 2016

शेतकऱ्यांची मुले बनविणार १००० गावांना रोख मुक्त (कॅशलेस)!



पुण्यातील वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा ली या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या कंपनीने १००० गावांना कॅशलेस करण्याचे ध्येय ठेवले आहे. 
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला पूरक उपक्रम म्हणून १००० कॅशलेस व्हिलेज निर्माण करण्यात येणार आहे. 
श्री पुंडलिक सीताराम वाघ हे स्वतः शेतकरी असल्यामुळे गावाकडील समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे नोटा बंदीच्या निर्णयानंतर शेतकरी व खेड्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून या अँप ची निर्मिती करण्यात आली आहे. 
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे. 
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल. 
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल. 
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व नोटबंदीचा त्रास होऊ नये यासाठी या ऍप ची निर्मिती केली आहे. अधिक माहिती साठी www.acashless.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्यावी. 
या उपक्रमासाठी लागणारे अँप हे पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय ग्रामीण व्यावसायिकांना व वापर कर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. तरी या उपक्रमासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी श्री पुंडलिक वाघ याना संपर्क करावा. अधिक माहिती साठी ०९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करावा किंवा www.acashless.com या संकेत स्थळाला भेट द्यावी. 



वाशीम जिल्ह्यातील आमखेडा होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव !



संपूर्ण पणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून रोख मुक्त गाव होण्याचा मान वाशीम जिल्ह्यातील आमखेडा या गावाने मिळवला आहे. 
श्री. अविनाश माणिकराव जोगदंड यांच्या पुढाकाराने आमखेडा हे गाव संपूर्ण पणे कॅशलेस करण्यात येणार आहे. 
विशेष म्हणजे यासाठी लागणारे तंत्रज्ञान A Cashless App शेतकऱ्यांच्या IT क्षेत्रातील मुलांनी बनवले आहे. ग्रामीण भागातील जनतेला सहज वापरता येईल अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे.  
नोटा बंदी नंतर अशा पद्धतीने Cashless होणारे हे भारतातील पहिले गाव आहे. आमखेडा हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून पूर्ण रोख मुक्त होत आहे. हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील १००० गाव  Cashless करण्याचे स्वप्न पूर्ण करून देशाच्या विकासासाठी हातभार लावण्यात येणार आहे. 
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे. 
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल. 
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल. 
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व नोटबंदीचा त्रास होऊ नये यासाठी या ऍप ची निर्मिती केली आहे. अधिक माहिती साठी www.acashless.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्यावी. 

आपणा सर्वाना विनंती आहे कि आपण  A Cashless App डाउनलोड करावे व इतरांनाही प्रवृत्त करावे. 


आमखेडा येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १००० गवे Cashless बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही हातभार लावू शकता. आपला सर्वांचा सहभाग देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. 
डिजिटल गाव- संकल्पना!  www.digitalgao.com


डिजिटल गाव हि संकल्पना (Education, Entrepreneurship, Employment and Economical development)  शिक्षण व्यवस्था, उद्योजकता, रोजगार  व आर्थिक विकास  या चतुःसूत्री  वर आधारित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून गावांना विकसित करण्याचे ध्येय डिजिटल गाव या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. संपूर्ण पणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल गाव हि संकल्पना राबवली आहे. 

गावातील शिक्षण व्यवस्था ऑनलाईन करणे व शाळा महाविद्यालयांना लागणारे तंत्रज्ञान पुरविणे, शेती माल विक्रीसाठी लागणारे तंत्रज्ञान मोबाईल  ऍप द्वारे व ई- कॉमर्स वेबसाईट चा वापर करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, रोख मुक्त खरेदी-विक्री साठी लागणारे 'कॅशलेस ऍप', गावातील सोयी सुविधा व पर्यटनातून रोजगार वाढविण्यासाठी 'ग्रामयात्रा' हि पर्यटन संकल्पना  यासारख्या गोष्टी डिजिटल गाव या संकल्पनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

कॅशलेस ऍप-
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे. 
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल. 
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल. 
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी. www.acashless.com

aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व ऑनलाईन पैसे पाठविता यावे यासाठी कॅशलेस ऍप ची निर्मिती केली आहे. 

शिक्षण व्यवस्था 
गावांचा विकास होण्यासाठी दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण व्यवस्थे मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालय चालवण्यासाठी लागणारे 'ऑनलाईन ERP सॉफ्टवेअर' तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेणे, परीक्षा पद्धती ऑनलाईन घेणे, पालकांना विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक, हजेरी, दैनंदिन अभ्यासक्रम याविषयीची माहिती ऍप द्वारे दिली जाते, ग्रंथालय व्यवस्थापन करण्यासाठी सॉफ्टवेअर, शाळेची फी ऑनलाईन पद्धतीने भरणे, वसतिगृहाची माहिती सॉफ्टवेअर मध्ये घेणे, वाहतूक व्यवस्था जी पी एस तंत्रज्ञान वापरून ऍप द्वारे नियंत्रित करणे यासारख्या गोष्टी सॉफ्टवेअर, मोबाइल ऍप या तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केल्या आहेत. 
याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती, करिअर च्या संधी याविषयीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. 
www.careerse.com 

माय-शेती - शेती मालाला योग्य भाव मिळण्यासाठी थेट ग्राहकांना ऑनलाईन विक्री. 
शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी माय शेती हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. माय शेती या ऍप वरून शहरातील नागरिक शेती माल खरेदी करू शकणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू, तांदूळ, ज्वारी बाजरी, डाळी यासारख्या अनेक वस्तू 'मायशेती' या ऍप द्वारे विक्री करता येणार आहेत. यामधून शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव निश्चित मिळेल.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी.  www.mysheti.com

ग्रामयात्रा- भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्यटन. 
शेती बरोबरच ग्रामीण लोकांना इतर उत्पादनाची साधने उपलब्ध व्हावी या दृष्टीने ग्राम यात्रा या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली आहे. शहरी व्यक्तींना पर्यटनाचा एक दर्जेदार पर्याय म्हणून ग्राम यात्रा सुरु करण्यात आली आहे.

ज्या गावांना ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे अशा ठिकाणी ग्राम यात्रेचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. यासाठी www.gramyatra.com या अत्याधुनिक वेबसाईट वरून जगातील कोणीही ग्राम यात्रेच्या टूर साठी नोंदणी करू शकणार आहे. परदेशातील प्रवासी व शहरातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा 'ग्राम यात्रा' मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
शहरातील सर्व 'टूर ऑपरेटर' ग्राम यात्रा ला चालना देण्यासाठी पुढे यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी. www.gramyatra.com

अशा पद्धतीने या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून गाव विकसित करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. संपूर्णपणे डिजिटल गाव करण्यासाठी
तंत्रज्ञान विकसित करण्यापासून ते राबविण्यापर्यंत सर्व गोष्टी आतापर्यंत एक शेतकऱ्यांचा समूह  करत आहे. संपूर्ण भारतातील जास्तीत जास्त गाव डिजिटल व्हावेत असे स्वप्न आहे.
गावांचा विकास झाल्याशिवाय भारत विकसित होऊ शकणार नाही. त्यासाठी गावांतील लोकांना प्रशिक्षित करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यावश्यक आहे. बेरोजगारी, कुपोषण, गरिबी, अंधश्रद्धा व यातून आलेले नैराश्य, शेतकऱ्यांमध्ये वाढलेले आत्महत्येचे प्रमाण या सर्व समस्यांवर रामबाण उपाय काढण्यासाठी विविध संकल्पना एकत्र करून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
हि संकल्पना उद्योजक, गावांचे सरपंच, राज्य सरकार वा केंद्र सरकार यांनी देशभर राबवावी अशी अपेक्षा आहे.

प्राथमिक स्तरावर महाराष्ट्रातील तीन गावांची निवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर डिजिटल गावांची चाचणी झाल्यावर संपूर्ण भारतात हि संकल्पना राबविण्यात येणार आहे. जग प्रसिद्ध कैलास लेणी असलेले 'वेरूळ' हे गाव, वाशीम जिल्ह्यातील 'आमखेडा' हे गाव, व पुणे जिल्ह्यातील अडवली हे गाव या गावांची निवड करण्यात  करण्यात आली आहे. 
डिजिटल गाव या संकल्पनेसाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान पुण्यातील वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा. ली. या कंपनीने दोन वर्ष अथक परिश्रम करून विनामूल्य तयार करून दिले आहे. विशेष म्हणजे हि कंपनी दोन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चालू केली आहे, त्यापैकी एकजण आजही पूर्णवेळ शेती करतात. 
आमखेडा येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १००० गावे डिजिटल व Cashless बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही हातभार लावू शकता. आपला सर्वांचा सहभाग देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. 

Be cashless, use ‘aCashless’.


Dear citizens of the country, please try to become cashless! Try to make most of the facilities created for cashless transactions, it will help to create a corruption free country. It is t onlyhe way to help the nation prosper.
In a way it will help everyone to become safe and tension free. No need to carry any cash or keep a watch on your wallet. No fear of theft, no fear of losing any thing. It is a great experience. Lets take an oath to make India a cashless nation. It is a great opportunity for all of us to participate in the nation-building program.
Our contribution in making India a cashless nation is an android application called ‘acashless’.
It is a simple mobile application which can be used anywhere.

On 1st December 2016 ‘acashless’ has made Amkheda the first Cashless village in our country.
For more details please visit www.acashless.com