Tuesday, August 23, 2016

धंदेवाईक मीडिया वर विश्वास ठेऊ नका.

भारतातील वर्तमान पत्रे एक तर मूर्ख लोक चालवत आहेत किंवा या नालायकांना खोट्या बातम्या छापण्यासाठी कुठून तरी पैसे मिळत आहे. भारतीय पी व्ही सिंधू ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकली ते सोडून हे नालायक तिच्या जातीविषयी च्या शोधाविषयीच्या खोट्या बातम्या छापत होते. तिच्या यशाविषयी, गुणांविषयी बोलायचे सोडून 'काही मूर्खांनी त्या दिवशी गुगल वर काय सर्च केले' याची बातमी दाखवत होते. लाज वाटायला पाहिजे असल्या पत्रकारांना? कुठून मिळाला आपणाला हा गुगल चा रिपोर्ट? गुगल ने नेमका जातीविषयीचा रिपोर्ट का जाहीर केला? जर आपण शोधून काढला असेल तर, आपणाला जातीविषयीचा रिपोर्ट का शोधावा वाटला?  आणि सर्वात महत्वाचे आधुनिक तंत्रज्ञान, त्यातील आकडेवारी कशी शोधायची आणि कशी वापरायची हे कळत नसेल तर खोट्या बातम्या का छापता? फक्त सनसनाटी पाहिजे म्हणून कि आपला मूर्खपणा सिद्ध करण्यासाठी? 
आश्चर्य याचे वाटते कि, पत्रकारांना पाहिजे तसा  विचार ते आपणाला करायला लावतात, प्रसंगी खोट्या बातम्या देऊन सुद्धा!  आपण नकळत त्याच्याकडे ओढले जातो. अनेक तथाकथित बुद्धिवादी लोक सुद्धा या खोट्या बातम्यांवर चर्चा करण्यात मग्न होतात, अंधानुकरण करणारा एक वर्ग पटापट आपापल्या परीने सोशल मीडिया वर अशा गोष्टी पसरवितात.
युवकांनो विचार करा, मीडिया आपणाला चांगल्या गोष्टी विषयी विचार करू देण्यापेक्षा फालतू विषय समोर ठेवतो. असल्या फालतू, धंदेवाईक मीडिया वर विश्वास ठेऊ नका. स्वतः विचार करा, सजग व्हा, बुद्धिमान व्हा आणि खरे-खोटे, योग्य-अयोग्य काय आहे याचा निर्णय स्वतः घेत जा.