दुष्काळ ग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी दि १० व ११ ऑक्टो रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे व औरंगाबाद मधील गंगापूर तालुक्यामध्ये १४ गावांना भेट दिली. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. काही निवडक प्रतिक्रिया-
''आम्हा शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही, आम्ही वर्षभर शेतात राबतो, मेहनत करतो. धान्य पिकवतो. त्यातून मिळणारे चार पैसे म्हणजे आमचे उत्पन्न! आम्हाला भेटायला कोणी कधी येत नाही. आमदार खासदार फक्त निवडणुका जवळ आल्या कि भेटी देतात, मोठाली आश्वासने देतात, पण काहीही काम करत नाही.
आपण कोण? कुठले? आम्हाला काही माहिती नाही. पण आपण आपल्या खर्चाने कोणताही स्वार्थ न ठेवता इथपर्यंत आलात त्यामुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला आहे. आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. आमची काहीही मागणी नाही, मदत नको, पण सहकार्य करू शकला तर आनंद होईल. अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या.
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना "दिवाळीची भेट" पाठविण्यासाठी www.linkbharat.com या वेब साईट ला अवश्य भेट द्या.