संपूर्ण पणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून रोख मुक्त गाव होण्याचा मान वाशीम जिल्ह्यातील आमखेडा या गावाने मिळवला आहे.
श्री. अविनाश माणिकराव जोगदंड यांच्या पुढाकाराने आमखेडा हे गाव संपूर्ण पणे कॅशलेस करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी लागणारे तंत्रज्ञान A Cashless App शेतकऱ्यांच्या IT क्षेत्रातील मुलांनी बनवले आहे. ग्रामीण भागातील जनतेला सहज वापरता येईल अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे.
नोटा बंदी नंतर अशा पद्धतीने Cashless होणारे हे भारतातील पहिले गाव आहे. आमखेडा हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून पूर्ण रोख मुक्त होत आहे. हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील १००० गाव Cashless करण्याचे स्वप्न पूर्ण करून देशाच्या विकासासाठी हातभार लावण्यात येणार आहे.
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे.
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल.
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल.
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे. aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व नोटबंदीचा त्रास होऊ नये यासाठी या ऍप ची निर्मिती केली आहे. अधिक माहिती साठी www.acashless.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्यावी.
आपणा सर्वाना विनंती आहे कि आपण A Cashless App डाउनलोड करावे व इतरांनाही प्रवृत्त करावे.
आमखेडा येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १००० गवे Cashless बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही हातभार लावू शकता. आपला सर्वांचा सहभाग देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे.