Thursday, May 26, 2016

MY SHETI माय शेती द्वारे शेतकरी करणार व्यापार !


यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. शेतात धान्य पिकले नाही, त्यामुळे कसलेही उत्पन्न नाही. अनेक सधन शेतकरी सुद्धा पोट भरण्यासाठी स्थलांतरित झाले, सामान्य शेतकरी मरण येत नाही म्हणून जगतो आहे तर अनेक जन आत्महत्या करत आहेत. आणि यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली जात आहे.
शेतकरी हा कायमच गरीब आहे पण इतकी वाईट परिस्थिती कधीही आली नव्हती. दुष्काळ ग्रस्तांसाठी काम करत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांनी विचार करायला सुरुवात केली कि, शेतकरी एवढे मागासलेले का?
त्यावर अनेक कारणे आम्हाला मिळाली. मुख्य म्हणजे अडाणी पणा, आड मुठे पणा, आणि धडपड न करण्याची वृत्ती. मी स्वतः गेल्या दहा महिन्यापासून शेतकऱ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली. अनेक सभा घेतल्या, अनेकांना वैयक्तिक भेटलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे सर्वांगीण बाजूने विचार करता आला.
शेतकरी खरे तर गरीब नाहीच, तो गरीब असू शकत नाही, कारण तो भरपूर धान्य पिकवतो, उत्पन्न चांगले मिळते. पण त्याला त्यातून पैसे मिळवता येत नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर शेकडो व्यापारी करोडपती आहेत, आणि शेतकरी मात्र गरीबच! प्रत्यक्ष अभ्यासातून असे जाणवले कि, शेतकरी लुटला जात आहे, फसवला जात आहे. शेतकऱ्याला लागणारे बी बियाणे, खते, कीटक नाशके, अवजारे सर्व व्यापार्याकडून खरेदी करायचे, गरज पाहून व्यापारी वाट्टेल त्या किमतीला या सर्व गोष्ठी विकतो. शेतात पिकलेले धान्य पुन्हा व्यापार्यालाच विकायचे, तेव्हा तो मातीमोल किमतीला विकत घेतो. त्या मालावर प्रचंड नफा कमावतो. शेतकरी मात्र पूर्णपणे नागवला जातो. त्याच्या अशिक्षित पणाचा गैर फायदा घेणारे अनेक लुटारू आहेत. एवढ्या दुष्काळात सुद्धा एका सुद्धा व्यापार्याने आत्महत्या केल्याचे ऐकले आहे का? नाही. कारण त्यांनी शेतकऱ्यांना लुटून प्रचंड पैसा जमवला आहे.
आता मात्र आम्ही शेतकरी व्यापार करणार आहे, आमचा माल आम्ही विकणार आहोत. आम्हाला लागणारा माल सुद्धा आम्हीच उत्पादकांकडून खरेदी करणार आहोत. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी  एकत्र येउन  'माय शेती' नावाची कंपनी  सुरुवात केली आहे. आजपासून आम्ही होलसेल भावात  किराणा विक्री सुरुवात करत आहोत. पहिले दुकान वाळूज, ता गंगापूर, औरंगाबाद येथे आज दि-२७ मे रोजी सुरु करत आहोत. लवकरच शेतकऱ्यांचा गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी, कडधान्ये, अशा अनेक वस्तू पुणे, मुंबई सारख्या शहरात विक्री साठी उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी 'MYSHETI' माय शेती नावाचे  APP व www.mysheti.com हि वेब साईट सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमातून  शेतकऱ्यांना नफा मिळावा व ग्राहकांचा फायदा व्हावा हा उद्देश आहे.











No comments:

Post a Comment