भारत म्हणजे तेजस्वी भुमी! ज्ञानी, विद्वान लोकांचा देश! बुद्धिमान लोकांचा देश! सुसंस्कृत, सभ्य व विशाल दृष्टीकोन असणाऱ्या लोकांचा देश!
भारत जेव्हा प्रगतीच्या शिखरावर होता, सर्व बाबतीत महासत्ता होता त्या काळी भारतीयांनी प्रेम, अहिंसा, इ. गुणाचा प्रचार व प्रसार केल. कुठेही अतिक्रमण केले नाही,कोणालाही लुटले नाही, उलट आपल्याकडील संपत्तीने त्यांना समृद्ध केले. भारतीयांनी इतराना जगणे शिकवले, संस्कृती दिली, शिक्षण दिले, व त्यांना स्वजन मानून सन्मान केला.
भारतीयांच्या उदारतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कंबोडिया मधील अंकोर वाट सारखे हिंदू मन्दिरे.
बाराव्या शतकामध्ये राजा सूर्यवर्मन याने बांधलेले विष्णू मंदिर हे आजही जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. स्थापत्यशास्त्र, खगोलशास् त्र, शिल्पकला, इ शास्त्राचा जगातील सर्वोच्च अविष्कार म्हणजे अंगकोर वाट मन्दिर.
संस्कृतमधील "नगर" या शब्दाचा अपभ्रंश ख्मेर भाषे मध्ये "नोकोर" असा झाला व त्यावरून "आंग्कोर" या शब्दाची व्युत्पत्ती झाली. "वाटिका" या शब्दापासून "वाट" या शब्दाची निर्मिती झाली. ‘अंकोर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘नगर’ असा असला, तरी नंतरच्या काळात ‘देऊळ’ह्याही अर्थी हा शब्द रूढ झाला.
अंकोर वाट मंदिराच्या बाजूला प्रचंड मोठी भिंत बांधलेली अहे. त्या बाहेर १९० मीटर रुंद व आठ मीटर खोल असा भला मोठा मानवनिर्मित खंदक खोदला अहे. खंदकाचा घेर सुमारे २० किमी एवढा मोठा अहे.
एकावर एक असणाऱ्या तीन चौथऱ्यावर या मंदिराची उभारणी केलेली अहे. प्रत्येक चौथऱ्याची उंची सु. साडेचार ते सहा मी. एवढी अहे. मुख्य मंदिर २०४ मी. रुंद व २२१ मी. लांब व ६६ मी. उंच आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार पश्चिम दिशेला अहे. मुख्य मंदिर हे पुराण ग्रंथातील मेरु पर्वताची प्रतिकृती अहे.
मुख्य मंदिराच्या सभोवती सुरेख भिंती आहेत. त्या मेरूपर्वताला घातलेल्या वासुकी नागाच्या विळख्याचे प्रतीक मानल्या जातात. मुख्य मंदिरापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजले जाते.
हे मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवलेले अहे.
मुख्य मंदिरातील सर्वांत बाहेरील भिंतीवर अत्यंत कलात्मक पद्धतीने विविध विषयावर आधारित कोरीव काम केलेले अहे. यामध्ये रामायण व महाभारता मधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर राजा सूर्यवर्मन व त्याच्या सेनापतींची चित्रे कोरली आहे तर पूर्वेकडील भिंतीवर देव व दानव यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या प्रसंग कोरलेला आहे. या शिवाय भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव,माणसाच्या चांगल्या वाईट कृत्यामुळे मिळणारे स्वर्ग व नरक, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध, देव आणि असुर यांचा संग्राम अशी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय त्या काळातील जन जीवन, रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा केलेला प्रयत्न,यासारखे अनेक दृश्ये कोरलेली आहेत.
अंकोर वाट मंदिरातील एक मुख्य आकर्षण म्हणजे विविध अलंकार ल्यालेल्या अप्सरा! तीन हजारापेक्षा जास्त अप्सरा कोरलेल्या असून विविध शैलीची केशभूषा, वेशभूषा,दागिने इ त्या काळाचे दर्शन घडवितात.
प्रत्येक भारतीयाने एकदा तरी या मंदिरांना भेट दिली पाहिजे. आपली उच्च संस्कृती समजून घेतली पहिजे. जगभरातून लाखो लोक हि मंदिरे पाहण्यासाठी येत असतात, पण भारतातील लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा नाही.
या ठिकाणी शिव, ब्रम्ह, विष्णू यांची अनेक मंदिरे अहेत. प्रत्येक मंदिर अत्यंत भव्य व वास्तुशास्त्राचा उत्कृस्त नमुना अहे. प्रत्येक मंदिराचा परिसर खूप मोठा अहे. सर्वत्र पाणी व हिरवीगार घनदाट जंगले आहेत. कंबोडीयाचे हवामान दमट स्वरूपाचे आहे, तरी पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान चांगले हवामान असते.
No comments:
Post a Comment