Wednesday, May 27, 2015

नापास झालात म्हणून काय झाले?


सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका. आज तुम्ही नापास झाला ते एका सामान्य परीक्षेत, अजून जीवन पूर्ण बाकी आहे. परीक्षेत नापास होणे म्हणजे जीवनात अपयशी होणे नव्हे.
एक खूप अर्थपूर्ण गोष्ट माझ्या वाचनात आली.
एकदा एका सिंहाने सर्व प्राण्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. परीक्षा सुरु झाली. पोहण्याच्या परीक्षेमध्ये मासा पहिला आला इतर सर्व प्राणी फेल झाले. सिंहाने माशाचे अभिनंदन केले व इतर सर्वाना नालायक म्हणून हिणवले.
काही काळानंतर धावण्याची परीक्षा झाली. हरीण पहिले आले, कासव नापास झाले. माशाला तर पळण्याच्या परीक्षेत प्रवेशच घेत आला नाही. उंच उडण्याच्या परीक्षेत गरुड पहिला आला, अनेकांना उडताच आले नाही. सिहाने जाहीर केले कि, ज्यांना उडता येत नाही ते सर्व फेल आहेत.
मित्रांनो, आपणाला एखादी गोष्ठ येत नाही याचा अर्थ आपण नालायक होत असा होत नाही. कदाचित आपली आवड वेगळी असेल, आपले गुण वेगळे असतील, ती आवड ओळखा, आवडीचे काम करा, यश नक्की मिळते.

मित्रांनो, आपली लायकी ठरवण्याचा अधिकार दुसर्यांना देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करा, संपूर्ण आयुष्य समोर आहे, स्वतःला ओळखा, प्रयत्न करा, आपला यशाचा मार्ग स्वतः ठरवा.
आजची शिक्षण पद्धती फक्त कारकून व नोकर तयार करण्यासाठी आहे. असे अनेक उद्योग धंदे आहेत जे कोणीही करू शकतो. जगात शिकलेल्या मुलापेक्षा नापास झालेल्या विद्यार्थांनी उज्वल यश संपादन केले याची अनेक उदाहरणे आहेत.
मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही परीक्षेत फेल नाही झालात, तुम्हाला ओळखण्यात, तुमचे गुण समजून घेण्यात,  परीक्षा घेणारे फेल झाले आहेत. निराश होऊ नका, चांगली पुस्तके वाचा, चांगल्या व्यक्तींना भेटा, थोरांची चरित्रे वाचा, आपले जीवन उज्वल करा.

No comments:

Post a Comment