दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा सामानाची भेट देण्याचे देण्यासाठी आवाहन.
महाराष्ट्रात भयानक दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासून सलग पाऊस कमी आहे. शेतकरी पार खंगला आहे, निराश झाला आहे. आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकणार नाही. आपण सर्वांनी पुढे येऊया. आपण आपल्या अन्नदात्याला दिवाळीची भेट देऊया. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया!
आपण काय करू शकता.
एका शेतकरी कुटुंबाला लागेल एवढे किराणा सामान आपण भेट म्हणून देऊ शकता.
शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार देऊ शकता.
शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पाठवू शकता.
आपण हे कसे करू शकता?
या कार्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता यावी म्हणून www.linkbharat.com या वेबसाईट वर शेतकऱ्यांची माहिती आहे. कृपया आपले नाव रजिस्टर करा. आपल्या इच्छेप्रमाणे योग्य शेतकऱ्यांची निवड करा व आपली 'दिवाळी भेट' आमच्याकडे सुपूर्द करा. आम्ही ती योग्य शेतकऱ्यांकडे पोहोचवू. आपण दिलेली भेट शेतकऱ्यांना मिळाल्यावर आपणाला त्यांच्याकडून फोन येईल. तसेच आपण सुद्धा त्या शेतकऱ्यांना संपर्क करू शकता. आपली मदत योग्य माणसापर्यंत पोहोचली याचा आनंद आपणाला मिळेल.
याशिवाय आपण www.linkbharat.com या वेब साईट वर दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरू शकता. एका शेतकरी कुटुंबासाठी साधारण १००० रु खर्च अपेक्षित आहे. तेवढ्या रकमेचा किराणा आपल्या नावाने त्या कुटुंबाकडे आम्ही पोहोचवू. त्याचे बिल आपणाला पाठवले जाईल. व त्या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक दिला जाईल.
शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देऊन आपणाला थांबायचे नाही. त्यापुढे सुद्धा त्यांच्याशी संपर्कात राहून मदत करायची आहे. शहरातील नागरिक व शेतकरी यांच्यामध्ये मैत्रीचे नाते वाढवायचे आहे. शेतकऱ्यांना शेती संबंधी बी-बियाणे, खते, औषधी व इतर गोष्टी साठी मदत करायची आहे. शेतकऱ्यांना सुद्धा आपले कोणीतरी शहरात आहे याचा आनंद असला पाहिजे, आणि शहरी व्यक्तींना आपली शेती आहे, असे वाटले पाहिजे. त्यांच्या मध्ये वैचारिक देवाण घेवाण झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने भारत जोडला जावा हा उद्देश आहे.
दुष्काळ हा निमित्त आहे. त्याचा 'इव्हेंट' होऊ नये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या खऱ्या अर्थाने थांबवाव्या असे वाटत असेल तर त्यावर योग्य मार्गाने काम करणे गरजेचे आहे. फक्त पैसे देऊन समस्या संपणार नाही. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना मदत मिळेल, इतर शेतकरी सुद्धा गरीब आहे, पण त्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. उलट ते धीराने परिस्थितीशी लढत आहेत. त्यांचेही कौतुक केले पाहिजे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून यापुढे दुष्काळाची झळ बसणार नाही यासाठी शेत तलाव तयार करणे, पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबवणे, शेतकर्यांना उत्पन्न देणारी व पर्यावरण पूरक झाडे लावणे, अशा उपाय योजना आम्ही करत आहोत.
आम्ही या कामासाठी आपणाला पैसे मागत नाही, मागणार नाही. त्यासाठी आपला प्रत्यक्ष सहभाग आवश्यक आहे. आम्ही फक्त आपणाला जोडण्याचे काम करू. काय काम करायचे यासाठी तज्ञ टीम वेळोवेळी मार्गदर्शन करील.
www.linkbharat.com या वेब साईट ची निर्मिती पुण्यातील वायुवा या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये पुण्यातील अनेक सामाजिक संस्था एकत्र येउन काम करत आहेत. यामध्ये ज्ञात्रा, मानसी जोशी चारीटेबल फौंडेशन, गीताई, आपुलकी, पाउलवाट या संस्थांचा सहभाग आहे. याशिवाय आणखी संस्थाना एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, तसेच या उपक्रमासाठी स्वयंसेवक हवे आहेत. यासाठी इच्छुकांनी ९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(महत्वाची विनंती- कृपया हि शेतकऱ्यांना मदत/ दान करण्यासाठी ची विनंती नाही, त्यांना दिवाळी भेट पाठवून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा संदेश देण्यासाठीचा प्रयत्न आहे. )
आपला विश्वासू
पुंडलिक वाघ
संपर्क-९८८१०००९५०.
ई मेल- pundlikwagh@gmail.com