आज सकाळी सकाळी एका शेतकऱ्याचा फोन आला.
साहेब राम राम! लिंक भारत उपक्रमा विषयी माहिती वाचली. शेतकऱ्यासाठी चांगले काम करताय. आनंद वाटला.
मी- धन्यवाद! आपले नाव व पत्ता आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही आपणाशी संपर्क करू.
शेतकरी-पण मला मदत नको आहे.
मी- अहो आम्ही हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी करत आहोत. आणि त्यांच्यासाठी दिवाळी भेट पाठवणार आहोत. पण…. आपणाला मदत का नको आहे?
शेतकरी- अहो साहेब, पण माझी परिस्थिती चांगली आहे. डाळींबाची बाग आहे, देवाची कृपा आहे.
साहेब, मी काय म्हणतो…. मला काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे. मी तुमच्या संस्थेला मदत करू का?
मी- अहो पण…. आपणाकडून मदत कशी घेणार?
शेतकरी- अहो एवढ्या चांगल्या उपक्रमात थोडासा वाटा घेऊ द्या कि गरिबाला.
शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या लिंक भारत या उपक्रमासाठी पहिली मदतीची इछ्या एका शेतकऱ्याने व्यक्त करावी यासारखा आनंद नाही. खरच खूप आनंद झाला.
No comments:
Post a Comment