Thursday, September 24, 2015

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना द्या किराणा मालाची भेट- visit www.linkbharat.com

महाराष्ट्रात भयानक दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासून सलग पाऊस कमी आहे. शेतकरी पार खंगला आहे, निराश झाला आहे. आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकणार नाही. आपण सर्वांनी पुढे येऊया. मदत नको, देणगी तर नकोच नको, आपण आपल्या अन्नदात्याला दिवाळीची भेट देऊया. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया!
आपण काय करू  शकता.
एका शेतकरी कुटुंबाला लागेल एवढे किराणा सामान आपण भेट म्हणून देऊ शकता.
शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार देऊ शकता.

आपण हे कसे करू शकता?
लिंक भारत या वेबसाईट वर शेतकऱ्यांची माहिती आहे. कृपया आपले नाव रजिस्टर करा. आपल्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड करा. आणि ठराविक शेतकऱ्यांना दिवाळी भेट पाठवू शकता.
आपणाला शक्य नसेल तर आपण हि मदत आमच्याकडे सुपूर्द करू शकता. आम्ही ती योग्य शेतकऱ्याकडे पोहोचवू. आपण दिलेली भेट शेतकऱ्यांना मिळाल्यावर आपणाला त्यांच्याकडून फोन येईल. आपली मदत योग्य माणसापर्यंत पोहोचली याचा आनंद आपणाला मिळेल. 

No comments:

Post a Comment