Tuesday, October 13, 2015

Visit www.linkbharat.com, support farmers!

दुष्काळ ग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी दि १० व ११ ऑक्टो रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे व औरंगाबाद मधील गंगापूर तालुक्यामध्ये १४ गावांना भेट दिली. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. काही निवडक प्रतिक्रिया-

''आम्हा शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही, आम्ही वर्षभर शेतात राबतो, मेहनत करतो. धान्य पिकवतो. त्यातून मिळणारे चार पैसे म्हणजे आमचे उत्पन्न! आम्हाला भेटायला कोणी कधी येत नाही. आमदार खासदार फक्त निवडणुका जवळ आल्या कि भेटी देतात, मोठाली आश्वासने देतात, पण काहीही काम करत नाही.
आपण कोण? कुठले? आम्हाला काही माहिती नाही. पण आपण आपल्या खर्चाने कोणताही स्वार्थ न ठेवता इथपर्यंत आलात त्यामुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला आहे. आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. आमची काहीही मागणी नाही, मदत नको, पण सहकार्य करू शकला तर आनंद होईल. अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या.
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना "दिवाळीची भेट" पाठविण्यासाठी www.linkbharat.com या वेब साईट ला अवश्य भेट द्या. 

Friday, September 25, 2015

www.linkbharat.com विषयी एका शेतकऱ्याशी फोनवरील संवाद!


आज सकाळी सकाळी एका शेतकऱ्याचा फोन आला.
साहेब राम राम!  लिंक भारत उपक्रमा विषयी माहिती वाचली.  शेतकऱ्यासाठी चांगले काम करताय. आनंद वाटला.
मी- धन्यवाद!  आपले नाव व पत्ता आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही आपणाशी संपर्क करू.
शेतकरी-पण मला मदत नको आहे.
मी- अहो आम्ही हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी करत आहोत. आणि त्यांच्यासाठी  दिवाळी भेट पाठवणार आहोत. पण…. आपणाला मदत का नको आहे?
शेतकरी- अहो साहेब, पण माझी परिस्थिती चांगली आहे. डाळींबाची बाग आहे, देवाची कृपा आहे.
साहेब, मी काय म्हणतो…. मला काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे. मी तुमच्या संस्थेला मदत करू का?
मी- अहो पण…. आपणाकडून मदत कशी घेणार?
शेतकरी- अहो एवढ्या चांगल्या उपक्रमात थोडासा वाटा घेऊ द्या कि गरिबाला.

शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या लिंक भारत या उपक्रमासाठी पहिली मदतीची इछ्या एका शेतकऱ्याने व्यक्त करावी यासारखा आनंद नाही. खरच खूप आनंद झाला.

Thursday, September 24, 2015

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना द्या किराणा मालाची भेट- visit www.linkbharat.com

महाराष्ट्रात भयानक दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासून सलग पाऊस कमी आहे. शेतकरी पार खंगला आहे, निराश झाला आहे. आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकणार नाही. आपण सर्वांनी पुढे येऊया. मदत नको, देणगी तर नकोच नको, आपण आपल्या अन्नदात्याला दिवाळीची भेट देऊया. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया!
आपण काय करू  शकता.
एका शेतकरी कुटुंबाला लागेल एवढे किराणा सामान आपण भेट म्हणून देऊ शकता.
शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार देऊ शकता.

आपण हे कसे करू शकता?
लिंक भारत या वेबसाईट वर शेतकऱ्यांची माहिती आहे. कृपया आपले नाव रजिस्टर करा. आपल्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड करा. आणि ठराविक शेतकऱ्यांना दिवाळी भेट पाठवू शकता.
आपणाला शक्य नसेल तर आपण हि मदत आमच्याकडे सुपूर्द करू शकता. आम्ही ती योग्य शेतकऱ्याकडे पोहोचवू. आपण दिलेली भेट शेतकऱ्यांना मिळाल्यावर आपणाला त्यांच्याकडून फोन येईल. आपली मदत योग्य माणसापर्यंत पोहोचली याचा आनंद आपणाला मिळेल. 

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा सामानाची भेट.


दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा सामानाची भेट देण्याचे  देण्यासाठी आवाहन.
महाराष्ट्रात भयानक दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासून सलग पाऊस कमी आहे. शेतकरी पार खंगला आहे, निराश झाला आहे. आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकणार नाही. आपण सर्वांनी पुढे येऊया. आपण आपल्या अन्नदात्याला दिवाळीची भेट देऊया. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया!
आपण काय करू  शकता.
एका शेतकरी कुटुंबाला लागेल एवढे किराणा सामान आपण भेट म्हणून देऊ शकता.
शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार देऊ शकता.
शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पाठवू शकता.

आपण हे कसे करू शकता?
या कार्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता यावी म्हणून www.linkbharat.com  या वेबसाईट वर शेतकऱ्यांची माहिती आहे. कृपया आपले नाव रजिस्टर करा. आपल्या इच्छेप्रमाणे  योग्य शेतकऱ्यांची निवड करा व  आपली 'दिवाळी भेट' आमच्याकडे सुपूर्द करा. आम्ही ती योग्य शेतकऱ्यांकडे पोहोचवू. आपण दिलेली भेट शेतकऱ्यांना मिळाल्यावर आपणाला त्यांच्याकडून फोन येईल. तसेच आपण सुद्धा त्या शेतकऱ्यांना  संपर्क करू शकता. आपली मदत योग्य माणसापर्यंत पोहोचली याचा आनंद आपणाला मिळेल.
याशिवाय आपण www.linkbharat.com या वेब साईट वर दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरू शकता. एका शेतकरी कुटुंबासाठी साधारण १००० रु खर्च अपेक्षित आहे. तेवढ्या रकमेचा किराणा आपल्या नावाने त्या कुटुंबाकडे आम्ही पोहोचवू. त्याचे बिल आपणाला पाठवले जाईल. व त्या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक दिला जाईल.
शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देऊन आपणाला थांबायचे नाही. त्यापुढे सुद्धा त्यांच्याशी संपर्कात राहून मदत करायची आहे. शहरातील नागरिक व शेतकरी यांच्यामध्ये मैत्रीचे नाते वाढवायचे आहे. शेतकऱ्यांना शेती संबंधी बी-बियाणे, खते, औषधी व इतर गोष्टी साठी  मदत करायची आहे. शेतकऱ्यांना सुद्धा आपले कोणीतरी शहरात आहे याचा आनंद असला पाहिजे, आणि शहरी व्यक्तींना आपली शेती आहे, असे वाटले पाहिजे. त्यांच्या मध्ये वैचारिक  देवाण घेवाण झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने भारत जोडला जावा हा उद्देश आहे. 
दुष्काळ हा निमित्त आहे. त्याचा 'इव्हेंट' होऊ नये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या खऱ्या अर्थाने थांबवाव्या असे वाटत असेल तर त्यावर योग्य मार्गाने काम करणे गरजेचे आहे. फक्त पैसे देऊन समस्या संपणार नाही. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना मदत मिळेल, इतर शेतकरी सुद्धा गरीब आहे, पण त्यांनी आत्महत्या  केल्या नाहीत. उलट ते धीराने परिस्थितीशी लढत आहेत. त्यांचेही कौतुक केले पाहिजे. 
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून यापुढे दुष्काळाची झळ बसणार नाही यासाठी शेत तलाव तयार करणे, पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबवणे, शेतकर्यांना उत्पन्न देणारी व पर्यावरण पूरक झाडे लावणे, अशा उपाय योजना आम्ही करत आहोत. 

आम्ही या कामासाठी आपणाला पैसे मागत नाही, मागणार नाही. त्यासाठी आपला प्रत्यक्ष सहभाग आवश्यक आहे. आम्ही फक्त आपणाला जोडण्याचे काम करू. काय काम करायचे यासाठी तज्ञ टीम वेळोवेळी  मार्गदर्शन करील. 

www.linkbharat.com या वेब साईट ची निर्मिती पुण्यातील वायुवा या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये पुण्यातील अनेक सामाजिक संस्था एकत्र येउन काम करत आहेत. यामध्ये ज्ञात्रा, मानसी जोशी चारीटेबल फौंडेशन, गीताई, आपुलकी, पाउलवाट या संस्थांचा सहभाग आहे. याशिवाय आणखी संस्थाना एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, तसेच या उपक्रमासाठी स्वयंसेवक हवे आहेत. यासाठी इच्छुकांनी ९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
(महत्वाची विनंती- कृपया हि शेतकऱ्यांना मदत/ दान करण्यासाठी ची विनंती नाही, त्यांना दिवाळी भेट पाठवून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा संदेश देण्यासाठीचा प्रयत्न आहे. )
आपला विश्वासू 

पुंडलिक वाघ 
संपर्क-९८८१०००९५०. 
ई मेल- pundlikwagh@gmail.com 

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी बनवूया!


दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाने दिवाळी साजरी करता यावी यासाठी पुण्यातील ज्ञात्रा व इतर काही संस्थांनी एकत्र येउन www.linkbharat.com या वेब साईट ची निर्मिती केली आहे. या द्वारे शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून आवश्यक किराणा सामान दिले जाणार आहे.
आपणाला विनंती आहे कि गरजू शेतकऱ्यांची माहिती द्यावी. या उपक्रमासाठी तालुका प्रमुख व ग्रामीण भागात काम करण्यासाठी स्वयंसेवक आवश्यक आहे, ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करावा किवा info@linkbharat.com या वर  मेल करावा.
या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.linkbharat.com या वेब साईट ला भेट द्या.


Sunday, September 20, 2015

Linkbharat

Linkbharat is a platform to connect urban people with the villagers and farmers. The main purpose of this website is to support the farmers.

नमस्कार, महाराष्ट्रात भयानक दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासून सलग पाऊस कमी आहे. शेतकरी पार खंगला आहे, निराश झाला आहे. आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकणार नाही. आपण सर्वांनी पुढे येऊया. मदत नको, देणगी तर नकोच नको, आपण आपल्या अन्नदात्याला दिवाळीची भेट देऊया. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया! आपण काय करू शकता.
एका शेतकरी कुटुंबाला लागेल एवढे किराणा सामान आपण भेट म्हणून देऊ शकता.
शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार देऊ शकता.
आपण हे कसे करू शकता?
www.linkbharat.com या वेबसाईट वर शेतकऱ्यांची माहिती आहे. कृपया आपले नाव रजिस्टर करा. आपल्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड करा. आणि ठराविक शेतकऱ्यांना दिवाळी भेट पाठवू शकता.
आपणाला शक्य नसेल तर आपण हि मदत आमच्याकडे सुपूर्द करू शकता. आम्ही ती योग्य शेतकऱ्याकडे पोहोचवू. आपण दिलेली भेट शेतकऱ्यांना मिळाल्यावर आपणाला त्यांच्याकडून फोन येईल. आपली मदत योग्य माणसापर्यंत पोहोचली याचा आनंद आपणाला मिळेल

Friday, July 10, 2015

वन्दे मातरम या राष्ट्रीय गीताचा अर्थ!

वन्दे- मी नमन करतो. मातरम- मातृभूमीला. 
सुजलाम- सर्वत्र मुबलक व योग्य पाणी असलेली. सुफलाम-विविध फळांनी समृद्ध असलेली. मलयज शितलाम-मलय पर्वताप्रमाणे शीतलता असलेली. शस्य शामलाम-पिकांनी समृद्ध  असलेली काळी भूमी, 
मातरम-मातृभूमीला. वन्दे मातरम-मातृभूमिला वंदन करतो. 
शुभ्र- पांढरा. ज्योत्स्ना-चांदणे. पुलकित-मनाला आनंद देणारे. यामिनिम-रात्री. पुल्ल-फुललेली. कुसुमित-विविध फुले. द्रुम- वनस्पतीची किवा झाडांचे खोड, दल-विविध पाने. शोभिनीम-शोभणारी. सुहासिनिम-योग्य हसणारी. सुमधुर भाषिणीम-योग्य मधुर बोलणारी. सुखदाम - सुख देणारी, वरदाम- विविध गरजा  पूर्ण करणारी. वन्दे मातरम- अशा मातृभूमीला मी वंदन करतो. 
मातृभूमीला मी वंदन करतो. माझी मातृभूमी खूप थोर व महान आहे. इथे पिण्यायोग्य मुबलक पाणी आहे, अनेक प्रकारची फळे आहेत, मलय पर्वताप्रमाणे सर्वत्र शीतलता आहे, विविध पिकांनी समृद्ध असलेली हि भूमी सावळ्या रंगानी शोभायमान झाली आहे. अशा मातृभूमीला मी वंदन करतो. 
रात्री पडणारे पांढरे शुभ्र चांदणे मनाला अत्यंत आनंद देणारे आहे, सर्वत्र फुललेल्या फुलामुळे झाडांची खोड, पाने फुले  अत्यंत मनोहारी दिसत आहे, योग्य हसणारी व अत्यंत मधुर संभाषण करणारी माणसे जेथे आहेत, अशा मातृभूमीला मी वंदन करतो. 

Saturday, June 13, 2015

खाजगी क्लासेसला प्रवेश घेताय ?

सावधान !  थांबा.  वाचा  व विचार करा . 

१) ज्या क्लासेसमधे  प्रवेश  घेणार आहात त्याविषयी संपुर्ण माहीती घेतली का ?
२) तेथे कोण शिकवणार आहेत ? त्यांची पात्रता काय आहे ?
३) क्लासरूम कसे आहेत ? प्रत्येक क्लासमध्ये कीती मुले आहेत ?
४) स्वच्छतागृहे  आहेत का? क्लासचे मालक कोण आहेत व त्यांचे Background  काय आहे ?
५) क्लासमध्ये आवश्यक साधने आहेत का ?
६) क्लासमध्ये CCTV कॅमेरे  आहेत का ? सुरक्षितता आहेत का ? क्लासचा एरिया कोणता आहे ? क्लासेस च्या वेळा कोणत्या आहेत ? क्लासची फी कीती आहे ?
* पुण्यातल्या Best Coaching Classes  ची माहीती घेण्यासाठी भेट द्या. 
                                              

                                 www.pycl.com

                              www.careerse.com 

Thursday, June 11, 2015

www.careerse.com get the right career options.

१० वी के बाद क्या करे, कौनसे महाविद्यालय अच्छे है, जो मविद्यालय में आप प्रवेश कर रहे वहा  पर क्या सुविधाये है, होस्टल, कोचिंग क्लासेस कहा है, उनके बारे में कैसे जानकारी मिलेगी? ऐसे अनेक सवालो का उत्तर आपको इस वेब पेज पर मिल जायेगा।
छात्रों के मदत के लिए www.careerse.com  यह वेब पेज बनाया गया है. आप इसका फायदा जरूर उठाये।

What after 10th and 12th?

10th and 12th results are out, now everybody is busy in getting admitted in good colleges. To find the good college, one needs to study the records of the particular college. 
There are many good colleges in every city, we should look after the facilities provided by the colleges. 
There is a  website www.careerse.com which gives details about the colleges, hostels, coaching classes etc. The main feature of this website is it provides the data of the hostels and scholarships for the students. 
This website will be very useful to the parents  and students who are finding colleges for the admissions. It will provide authentic and quality data and save your time and money. 
Please visit www.careerse.com website to get more details about the admissions.

Wednesday, May 27, 2015

नापास झालात म्हणून काय झाले?


सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका. आज तुम्ही नापास झाला ते एका सामान्य परीक्षेत, अजून जीवन पूर्ण बाकी आहे. परीक्षेत नापास होणे म्हणजे जीवनात अपयशी होणे नव्हे.
एक खूप अर्थपूर्ण गोष्ट माझ्या वाचनात आली.
एकदा एका सिंहाने सर्व प्राण्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. परीक्षा सुरु झाली. पोहण्याच्या परीक्षेमध्ये मासा पहिला आला इतर सर्व प्राणी फेल झाले. सिंहाने माशाचे अभिनंदन केले व इतर सर्वाना नालायक म्हणून हिणवले.
काही काळानंतर धावण्याची परीक्षा झाली. हरीण पहिले आले, कासव नापास झाले. माशाला तर पळण्याच्या परीक्षेत प्रवेशच घेत आला नाही. उंच उडण्याच्या परीक्षेत गरुड पहिला आला, अनेकांना उडताच आले नाही. सिहाने जाहीर केले कि, ज्यांना उडता येत नाही ते सर्व फेल आहेत.
मित्रांनो, आपणाला एखादी गोष्ठ येत नाही याचा अर्थ आपण नालायक होत असा होत नाही. कदाचित आपली आवड वेगळी असेल, आपले गुण वेगळे असतील, ती आवड ओळखा, आवडीचे काम करा, यश नक्की मिळते.

मित्रांनो, आपली लायकी ठरवण्याचा अधिकार दुसर्यांना देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करा, संपूर्ण आयुष्य समोर आहे, स्वतःला ओळखा, प्रयत्न करा, आपला यशाचा मार्ग स्वतः ठरवा.
आजची शिक्षण पद्धती फक्त कारकून व नोकर तयार करण्यासाठी आहे. असे अनेक उद्योग धंदे आहेत जे कोणीही करू शकतो. जगात शिकलेल्या मुलापेक्षा नापास झालेल्या विद्यार्थांनी उज्वल यश संपादन केले याची अनेक उदाहरणे आहेत.
मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही परीक्षेत फेल नाही झालात, तुम्हाला ओळखण्यात, तुमचे गुण समजून घेण्यात,  परीक्षा घेणारे फेल झाले आहेत. निराश होऊ नका, चांगली पुस्तके वाचा, चांगल्या व्यक्तींना भेटा, थोरांची चरित्रे वाचा, आपले जीवन उज्वल करा.

Friday, May 8, 2015

Angkor Wat-Cambodia!


भारत म्हणजे तेजस्वी भुमी! ज्ञानीविद्वान लोकांचा देश! बुद्धिमान लोकांचा देश! सुसंस्कृतसभ्य व विशाल दृष्टीकोन असणाऱ्या लोकांचा देश! 
भारत जेव्हा प्रगतीच्या शिखरावर होतासर्व बाबतीत महासत्ता होता त्या काळी भारतीयांनी प्रेमअहिंसाइ. गुणाचा प्रचार व प्रसार केल. कुठेही अतिक्रमण केले नाही,कोणालाही लुटले नाहीउलट आपल्याकडील संपत्तीने त्यांना समृद्ध केले. भारतीयांनी इतराना जगणे शिकवलेसंस्कृती दिलीशिक्षण दिलेव त्यांना स्वजन मानून सन्मान केला. 
भारतीयांच्या उदारतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कंबोडिया मधील अंकोर वाट सारखे  हिंदू मन्दिरे.  

बाराव्या शतकामध्ये राजा सूर्यवर्मन याने बांधलेले विष्णू मंदिर हे आजही जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. स्थापत्यशास्त्रखगोलशास्त्रशिल्पकलाइ शास्त्राचा जगातील सर्वोच्च अविष्कार म्हणजे अंगकोर वाट मन्दिर. 

संस्कृतमधील "नगर" या शब्दाचा अपभ्रंश ख्मेर भाषे मध्ये "नोकोर" असा झाला व त्यावरून "आंग्कोर" या शब्दाची व्युत्पत्ती झाली. "वाटिका" या शब्दापासून "वाट" या शब्दाची निर्मिती झाली. अंकोर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘नगर’ असा असलातरी नंतरच्या काळात ‘देऊळह्याही अर्थी हा शब्द रूढ झाला. 
अंकोर वाट मंदिराच्या बाजूला प्रचंड मोठी भिंत बांधलेली अहे. त्या बाहेर १९० मीटर रुंद व आठ मीटर खोल असा भला मोठा मानवनिर्मित खंदक खोदला अहे. खंदकाचा घेर सुमारे २० किमी एवढा मोठा अहे. 
 एकावर एक असणाऱ्या तीन चौथऱ्यावर या मंदिराची उभारणी केलेली अहे. प्रत्येक चौथऱ्याची उंची सु. साडेचार ते सहा मी. एवढी अहे. मुख्य मंदिर २०४ मी. रुंद व २२१ मी. लांब व ६६ मी. उंच आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार पश्चिम दिशेला अहे. मुख्य मंदिर हे पुराण ग्रंथातील मेरु पर्वताची प्रतिकृती अहे. 
मुख्य मंदिराच्या सभोवती सुरेख भिंती आहेत. त्या मेरूपर्वताला घातलेल्या वासुकी नागाच्या विळख्याचे प्रतीक मानल्या जातात. मुख्य मंदिरापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजले जाते. 
हे मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवलेले अहे. 

मुख्य मंदिरातील सर्वांत बाहेरील भिंतीवर अत्यंत कलात्मक पद्धतीने विविध विषयावर आधारित कोरीव काम केलेले अहे. यामध्ये रामायण व महाभारता मधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर राजा सूर्यवर्मन व त्याच्या सेनापतींची चित्रे कोरली आहे तर पूर्वेकडील भिंतीवर देव व दानव यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या प्रसंग कोरलेला आहे. या शिवाय भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव,माणसाच्या चांगल्या वाईट कृत्यामुळे मिळणारे स्वर्ग व नरकश्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वधदेव आणि असुर यांचा संग्राम अशी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय त्या काळातील जन जीवनरावणाने कैलास पर्वत उचलण्याचा केलेला प्रयत्न,यासारखे अनेक दृश्ये कोरलेली आहेत. 
अंकोर वाट मंदिरातील एक मुख्य आकर्षण म्हणजे विविध अलंकार ल्यालेल्या अप्सरा! तीन हजारापेक्षा जास्त अप्सरा कोरलेल्या असून विविध शैलीची केशभूषावेशभूषा,दागिने इ त्या काळाचे दर्शन घडवितात. 

प्रत्येक भारतीयाने एकदा तरी या मंदिरांना भेट दिली पाहिजे. आपली उच्च संस्कृती समजून घेतली पहिजे. जगभरातून लाखो लोक हि मंदिरे पाहण्यासाठी येत असतातपण भारतातील लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा नाही. 
या ठिकाणी शिवब्रम्हविष्णू यांची अनेक मंदिरे अहेत. प्रत्येक मंदिर अत्यंत भव्य व वास्तुशास्त्राचा उत्कृस्त नमुना अहे. प्रत्येक मंदिराचा परिसर खूप मोठा अहे. सर्वत्र पाणी व हिरवीगार घनदाट जंगले आहेत. कंबोडीयाचे हवामान दमट स्वरूपाचे आहेतरी पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान चांगले हवामान असते.