Friday, July 10, 2015

वन्दे मातरम या राष्ट्रीय गीताचा अर्थ!

वन्दे- मी नमन करतो. मातरम- मातृभूमीला. 
सुजलाम- सर्वत्र मुबलक व योग्य पाणी असलेली. सुफलाम-विविध फळांनी समृद्ध असलेली. मलयज शितलाम-मलय पर्वताप्रमाणे शीतलता असलेली. शस्य शामलाम-पिकांनी समृद्ध  असलेली काळी भूमी, 
मातरम-मातृभूमीला. वन्दे मातरम-मातृभूमिला वंदन करतो. 
शुभ्र- पांढरा. ज्योत्स्ना-चांदणे. पुलकित-मनाला आनंद देणारे. यामिनिम-रात्री. पुल्ल-फुललेली. कुसुमित-विविध फुले. द्रुम- वनस्पतीची किवा झाडांचे खोड, दल-विविध पाने. शोभिनीम-शोभणारी. सुहासिनिम-योग्य हसणारी. सुमधुर भाषिणीम-योग्य मधुर बोलणारी. सुखदाम - सुख देणारी, वरदाम- विविध गरजा  पूर्ण करणारी. वन्दे मातरम- अशा मातृभूमीला मी वंदन करतो. 
मातृभूमीला मी वंदन करतो. माझी मातृभूमी खूप थोर व महान आहे. इथे पिण्यायोग्य मुबलक पाणी आहे, अनेक प्रकारची फळे आहेत, मलय पर्वताप्रमाणे सर्वत्र शीतलता आहे, विविध पिकांनी समृद्ध असलेली हि भूमी सावळ्या रंगानी शोभायमान झाली आहे. अशा मातृभूमीला मी वंदन करतो. 
रात्री पडणारे पांढरे शुभ्र चांदणे मनाला अत्यंत आनंद देणारे आहे, सर्वत्र फुललेल्या फुलामुळे झाडांची खोड, पाने फुले  अत्यंत मनोहारी दिसत आहे, योग्य हसणारी व अत्यंत मधुर संभाषण करणारी माणसे जेथे आहेत, अशा मातृभूमीला मी वंदन करतो.