Wednesday, December 7, 2016

डिजिटल गाव- संकल्पना!  www.digitalgao.com


डिजिटल गाव हि संकल्पना (Education, Entrepreneurship, Employment and Economical development)  शिक्षण व्यवस्था, उद्योजकता, रोजगार  व आर्थिक विकास  या चतुःसूत्री  वर आधारित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून गावांना विकसित करण्याचे ध्येय डिजिटल गाव या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. संपूर्ण पणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल गाव हि संकल्पना राबवली आहे. 

गावातील शिक्षण व्यवस्था ऑनलाईन करणे व शाळा महाविद्यालयांना लागणारे तंत्रज्ञान पुरविणे, शेती माल विक्रीसाठी लागणारे तंत्रज्ञान मोबाईल  ऍप द्वारे व ई- कॉमर्स वेबसाईट चा वापर करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, रोख मुक्त खरेदी-विक्री साठी लागणारे 'कॅशलेस ऍप', गावातील सोयी सुविधा व पर्यटनातून रोजगार वाढविण्यासाठी 'ग्रामयात्रा' हि पर्यटन संकल्पना  यासारख्या गोष्टी डिजिटल गाव या संकल्पनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

कॅशलेस ऍप-
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे. 
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल. 
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल. 
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी. www.acashless.com

aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व ऑनलाईन पैसे पाठविता यावे यासाठी कॅशलेस ऍप ची निर्मिती केली आहे. 

शिक्षण व्यवस्था 
गावांचा विकास होण्यासाठी दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण व्यवस्थे मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालय चालवण्यासाठी लागणारे 'ऑनलाईन ERP सॉफ्टवेअर' तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेणे, परीक्षा पद्धती ऑनलाईन घेणे, पालकांना विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक, हजेरी, दैनंदिन अभ्यासक्रम याविषयीची माहिती ऍप द्वारे दिली जाते, ग्रंथालय व्यवस्थापन करण्यासाठी सॉफ्टवेअर, शाळेची फी ऑनलाईन पद्धतीने भरणे, वसतिगृहाची माहिती सॉफ्टवेअर मध्ये घेणे, वाहतूक व्यवस्था जी पी एस तंत्रज्ञान वापरून ऍप द्वारे नियंत्रित करणे यासारख्या गोष्टी सॉफ्टवेअर, मोबाइल ऍप या तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केल्या आहेत. 
याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती, करिअर च्या संधी याविषयीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. 
www.careerse.com 

माय-शेती - शेती मालाला योग्य भाव मिळण्यासाठी थेट ग्राहकांना ऑनलाईन विक्री. 
शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी माय शेती हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. माय शेती या ऍप वरून शहरातील नागरिक शेती माल खरेदी करू शकणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू, तांदूळ, ज्वारी बाजरी, डाळी यासारख्या अनेक वस्तू 'मायशेती' या ऍप द्वारे विक्री करता येणार आहेत. यामधून शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव निश्चित मिळेल.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी.  www.mysheti.com

ग्रामयात्रा- भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्यटन. 
शेती बरोबरच ग्रामीण लोकांना इतर उत्पादनाची साधने उपलब्ध व्हावी या दृष्टीने ग्राम यात्रा या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली आहे. शहरी व्यक्तींना पर्यटनाचा एक दर्जेदार पर्याय म्हणून ग्राम यात्रा सुरु करण्यात आली आहे.

ज्या गावांना ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे अशा ठिकाणी ग्राम यात्रेचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. यासाठी www.gramyatra.com या अत्याधुनिक वेबसाईट वरून जगातील कोणीही ग्राम यात्रेच्या टूर साठी नोंदणी करू शकणार आहे. परदेशातील प्रवासी व शहरातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा 'ग्राम यात्रा' मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
शहरातील सर्व 'टूर ऑपरेटर' ग्राम यात्रा ला चालना देण्यासाठी पुढे यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट ला भेट द्यावी. www.gramyatra.com

अशा पद्धतीने या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून गाव विकसित करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. संपूर्णपणे डिजिटल गाव करण्यासाठी
तंत्रज्ञान विकसित करण्यापासून ते राबविण्यापर्यंत सर्व गोष्टी आतापर्यंत एक शेतकऱ्यांचा समूह  करत आहे. संपूर्ण भारतातील जास्तीत जास्त गाव डिजिटल व्हावेत असे स्वप्न आहे.
गावांचा विकास झाल्याशिवाय भारत विकसित होऊ शकणार नाही. त्यासाठी गावांतील लोकांना प्रशिक्षित करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यावश्यक आहे. बेरोजगारी, कुपोषण, गरिबी, अंधश्रद्धा व यातून आलेले नैराश्य, शेतकऱ्यांमध्ये वाढलेले आत्महत्येचे प्रमाण या सर्व समस्यांवर रामबाण उपाय काढण्यासाठी विविध संकल्पना एकत्र करून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
हि संकल्पना उद्योजक, गावांचे सरपंच, राज्य सरकार वा केंद्र सरकार यांनी देशभर राबवावी अशी अपेक्षा आहे.

प्राथमिक स्तरावर महाराष्ट्रातील तीन गावांची निवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर डिजिटल गावांची चाचणी झाल्यावर संपूर्ण भारतात हि संकल्पना राबविण्यात येणार आहे. जग प्रसिद्ध कैलास लेणी असलेले 'वेरूळ' हे गाव, वाशीम जिल्ह्यातील 'आमखेडा' हे गाव, व पुणे जिल्ह्यातील अडवली हे गाव या गावांची निवड करण्यात  करण्यात आली आहे. 
डिजिटल गाव या संकल्पनेसाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान पुण्यातील वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा. ली. या कंपनीने दोन वर्ष अथक परिश्रम करून विनामूल्य तयार करून दिले आहे. विशेष म्हणजे हि कंपनी दोन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चालू केली आहे, त्यापैकी एकजण आजही पूर्णवेळ शेती करतात. 
आमखेडा येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १००० गावे डिजिटल व Cashless बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही हातभार लावू शकता. आपला सर्वांचा सहभाग देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment